"आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस!", राष्ट्रवादीच्या नेत्यानेच केली टीका

06 Feb 2024 17:41:38

Jitendra Awhad


मुंबई :
जितेंद्र आव्हाड हा अतिशय घाणेरडा माणूस आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती. यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
हसन मुश्रीफ म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड हा अतिशय घाणेरडा माणूस आहे. अजित पवारांनी शरद पवारांबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचा उलट अर्थ घेऊन आव्हाडांनी 'ध' चा 'मा' केला आहे. त्यांना मुद्दाम कुरघोडी करायची असते. त्यांना अजित पवार कुटुंबाबद्दलच बोलायचं असतं. ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याच्यावर जितेंद्र आव्हाड का बोलत नाही. त्यांनी केवळ अजित पवारांवरच बोलायला सुरु केलं आहे," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0