कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साह्य्याने बहुराष्ट्रीय कंपनीला २१२ कोटींचा गंडा!

    06-Feb-2024
Total Views |
Deepfake scam

नवी दिल्ली
: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या विकासानंतर डीपफेकचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हाँगकाँगमधील एक कंपनी आता चक्क डीपफेकमुळे आर्थिक फसवणुकीला बळी पडली आहे. डीपफेक कॉलच्या मदतीने त्या कंपनीला २१२ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या, डीपफेक वापरून फसवणूक करणाऱ्याने कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याचा (सीएफओ) फोटो वापरून कार्यालयातील कर्मचाऱ्याला कॉन्फरन्स कॉल केला आणि त्यांना पैसे पाठवण्यास सांगितले. व्हिडीओ कॉलवर सीएफओला पाहिल्यानंतर कर्मचाऱ्याने दि. २ फेब्रुवारीला एवढी मोठी रक्कम ट्रान्सफरही केली.

त्यानंतर त्यांची मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हाँगकाँगमधली ही पहिलीच घटना आहे, त्यामुळे असं घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. फसवणुकीनंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, जानेवारीमध्ये पैशांची मागणी करणारा ईमेल आला होता, मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.त्यांना वाटले की CFO कडून आलेल्या कॉलमध्ये सर्वजण कंपनीचे असतील. कर्मचाऱ्याचे असेही म्हणणे आहे की कॉलवर पाहिलेल्या लोकांपैकी अनेकांचे चेहरे त्यांना माहीत होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर सहज विश्वास ठेवला. त्यांना माहित नव्हते की ते सर्व लोक डीपफेकच्या मदतीने तयार केले गेले आहेत.

कर्मचाऱ्याने सांगितले की व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांना त्यांचा परिचय विचारण्यात आला होता, जसे सामान्यतः वरिष्ठ करतात. यानंतर, आपण कंपनीचा CFO असल्याचे समजून आम्ही डीपफेक फसवणूक करणाऱ्याशी आठवडाभर बोललो. या कालावधीत कर्मचाऱ्याकडून २०० दशलक्ष हाँगकाँग डॉलर किमतीचे १५ व्यवहार करण्यात आले.कंपनीत एवढ्या मोठ्या रक्कमेचा गंडा घातल्याचे लक्षात येताच मुख्यालय आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर, या पद्धतीमुळे सीएफओकडून पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्याला डीपफेक कॉल केल्याचे समोर आले.

या घोटाळ्याचा खुलासा करताना पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अनेक लोकांच्या चेहऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती, परंतु ते सर्व डीपफेक होते. कर्मचाऱ्यांना त्याच्या शब्दात आमिष दाखवून त्याने कंपनीचे पैसे लुटले.आता या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अशा फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांनी ६ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी लोकांचे आयडी चोरले असून ५४ बँकांमध्ये ९० कर्ज अर्ज सादर केले आहेत. किमान २० प्रकरणांमध्ये, AI ला डीपफेकद्वारे फसवले गेले.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.