जरांगे-भूजबळ पुन्हा भिडले! म्हणाले, "आधी साधं..."

    06-Feb-2024
Total Views |

Bhujbal & Jarange


मुंबई :
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून यावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आधी ग्रामपंचायतीला उभे रहा, असे थेट आव्हानच आता मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिले आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. यावर आता छगन भुजबळांनी प्रतिक्रीया दिली आहे.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "जरांगेंना सांगा तू आधी ग्रामपंचायतीला उभा राहा. छगन भुजबळ ग्रामपंचायतच नाही तर, मुंबईच्या महानगरपालिकेत २५ वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला. त्यानंतर चारवेळा येवल्याला आमदार झाला. त्यामुळे तू मला सांगण्याची काही गरज नाही. तू आधी नीट उभा राहा."
 
ते पुढे म्हणाले की, "जरांदेखील कधी धनगर समाजाच्या बाजूने लढणार तर, कधी नाभिक समाजाकडून लढणार आहे असे म्हणून आमच्यात फुट पाडण्याचं काम करत आहे. तुम्हीच आमच्या धनगर आणि नाभिक समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत आहे. ते थांबवा, आमच्यावर खूप उपकार होतील. ओबीसी समाजातून आरक्षण घेण्याचं काम आधी मागे घ्या, आम्ही तुमचे उपकार मानू," असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.