शरद पवारांना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

    06-Feb-2024
Total Views |
Ajit pawar ncp official president

मुंबई :
राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह दोन्ही अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी निर्णय प्रलंबित होता. त्यावर आता आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
 
दरम्यान, अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात आला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून राष्ट्रवादी पक्ष हा अधिकृतरीत्या अजित पवारांकडे असणार आहे. तसेच, अजित पवार आता राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत. तसेच, शऱद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यानुसार, पवार गटाला वेगळं चिन्ह व पक्ष निवडावा लागेल. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.