अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर पुन्हा एकदा दिसणार एकत्र, 'नवरा माझा नवसाचा २' येणार भेटीला

    05-Feb-2024
Total Views |

navra maja navsacha
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला ७०-८० च्या दशकात नवसंजीवनी देणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव अग्रस्थानी येते. आजवर अनेक विनोदी चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी जोडी अशोक सराफ आणि सचिन पिळगावर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज झाले आहेत. १९ वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'नवरा माझा नवसाचा २'च्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे.
 
एका सामन्य कुटुंबातील स्त्री आपल्या नवऱ्याच्या जन्मासाठीचा नवस फेडण्यासाठी काय काय उपद्व्याप करते हे 'नवरा माझा नवसाचा' या विनोदीपटातून आपण २० वर्षांपुर्वी पाहिले. आता दुसऱ्य़ा भागात आणखी कोणता नवस असणार का आणि तो फेडण्साची काही मजेशीर पद्धत असणार का हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
 

navra maja navsacha 2 
 
दरम्यान, 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात पुन्हा तिच धमाल कलाकरांची फौज दिसणार का अशी विचारणा केली जात असताना यात अभिनेते अशोक सराफ असणार अशी माहिती त्यांनी स्वत:च मटाशी बोलताना दिली. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटात अशोक सराफ, सचिन, सुप्रिया पिळगावकर, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, विजय पाटकर अशी भन्नाट कल्लाकार मंडळी होती. यापैकी रीमा लागू, कुलदीप पवार, प्रदीप पटवर्धन ही कलाकार मंडळी मात्र आपल्याला सोडून गेली. त्यामुळे त्यांची उणीव या दुसऱ्या भागात जाणवणार यात शंकाच नाही. शिवाय दुसऱ्या भागात नव्या दमाची विमोदी कलाकारांची फळी दिसणार का हे देखील पाहणे तितेकेच औत्सुक्याचे असणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.