युवासेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्याची अखेर हकालपट्टी!

    05-Feb-2024
Total Views |

Shrikant Shinde


मुंबई :
युवासेनेचे नेते अनिकेत जावळकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रविवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका गुंडाने त्यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. अनिकेत जावळकर यांनीच ही भेट घडवून आणल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये पुण्यातील एक गुंड त्यांची भेट घेताना दिसत आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंची भेट घेणारा हा गुंड कोण? अशा चर्चा रंगल्या असताना तो पुण्यातील हेमंत दाभेकर असल्याची माहिती पुढे आली. शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी अनिकेत जावळकर यांनी श्रीकांत शिंदेंसोबत गुंड हेमंत दाभेकरची भेट घालून दिली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी त्वरित कारवाई करत अनिकेत जावळकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.