"श्रीदेवीची हत्या झाली होती!", आरोप करणाऱ्या महिलेने दाखवले खोटे पुरावे! सीबीआय चार्जशीट दाखल

    05-Feb-2024
Total Views |

shridevi
 
 
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या दीप्ती पिन्नती यांना हे प्रकरण चांगलेच भावले आहे. सीबीआयने स्वत:ला इन्विस्टिगेटर म्हणवणाऱ्या यूट्यूबर दीप्ती आर पिन्निती विरोधात आरोपपत्र दाखल केले असून श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काहींची बनावट पत्रे तयार केल्याचा गंभीर आरोप दीप्तीवर करण्यात आला आहे.
 
सीबीआयने गेल्या वर्षी मुंबईतील वकील चांदनी शाह यांच्या तक्रारीनंतर दीप्ती आर पिन्निती आणि तिचे वकील भरत सुरेश कामथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावेळी चांदनी शाह यांनी म्हटले होते की, “दीप्ती आर पिन्नितीने पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची पत्रे, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कागदपत्रे आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारचे रेकॉर्ड यांसारखे अनेक बनावट कागदपत्र तयार केले आहेत”.
 
दरन्यान, दीप्तीविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर, सीबीआयने २ डिसेंबर २०२३ रोजी भुवनेश्वरमधील तिच्या घराची झाडझडती घेतली होती. यावेळी तिचा फोन आणि लॅपटॉपसह अन्य डिजिटल उपकरणे जप्त केली होती. विशेष न्यायालयात सादर केलेल्या सीबीआयच्या अहवालानुसार, यूट्यूबवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्याशी संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे तपासात उघड झाले होते.
 
दरम्यान, दीप्ती आणि तिचे वकील भरत सुरेश कामथ यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत १२०-बी (गुन्हेगारी कट), ४६५, ४६९ आणि ४७१ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.