सौर उर्जेच्या मदतीने ई-वाहन रस्त्यावर धावणार; हरित उर्जेला सरकारचे पाठबळ

    05-Feb-2024
Total Views |
Rooftop Solar Panel solar energy to E vehicle

नवी दिल्ली :
देशातील छोट्या शहरात विशेषतः ग्रामीण भागात सौर उर्जेला प्रोत्साहन केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना यासंदर्भात तरतूद केली आहे. रुफटॉप सौरउर्जा पॅनेल लावण्याकरिता येणाऱ्या खर्चात घट दिसून आली आहे. त्याचबरोबर, अर्थमंत्री बजेट भाषणात म्हणाल्या, तिसऱ्या तिमाहीत सर्वाधिक ३५ टक्क्यांपर्यंत रुफटॉप सौर पॅनेल लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून धोरण तयार करण्यात आले असून भारतात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जवळपास ३६ लाखांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर, रुफटॉप सौर पॅनेलच्या माध्यमातून सौरउर्जा निर्मिती करून त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी करण्यात येत आहे. एकंदरीत, केंद्र सरकार, वाहननिर्मिती उद्योगसमूह व सौर उर्जा उद्योग यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास तब्बल ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाहनचालक आपले वाहन रुफटॉप सौर उर्जेच्या माध्यमातून चार्ज करत आहेत.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स लिमिटेड और टाटा पैसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (टीपीईएमएल) व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, गुजरात, राजस्थान मध्ये ई- वाहन जलदरित्या वापरले जात असून हा ग्राहकवर्ग किमतीवर जास्त लक्ष देत आहे व वीजेची किमत अधिक किफायतशीर समजत आहे, असेही ते म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.