ज्येष्ठ स्वयंसेवक सोमशेखर भट उडुपी यांचे निधन

    05-Feb-2024
Total Views |

Somshekhar Bhat Udupi
(RSS Somshekhar Bhat Udupi)

बंगळुरु : जनसंघाचे माजी ज्येष्ठ कार्यकर्ता, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सोमशेखर भट उडुपी (८९) यांचे रविवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री निधन झाले. आणीबाणीच्या काळात विशेषत: उडुपीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. संघ परिवार आणि भाजपमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह इतर अन्य प्रमुख व्यक्तींनी शोक व्यक्त केला असून संघ परिवारामध्ये हे नुकसान तीव्रपणे जाणवत असल्याचे सरकार्यवाहंनी म्हटले आहे. हिंदुत्वाप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि गंभीर प्रसंगी त्यांचे नेतृत्व यांनी सेवा केलेल्या संस्थांवर अमिट छाप सोडली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.