एनटीटी डेटा करणार ६ हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती

    05-Feb-2024
Total Views |
NTT Data Corporation 6k new Hires

नवी दिल्ली :
एनटीटी डेटा कॉर्पोरेशन अंतर्गत ६ हजार नवीन उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या कंपनीत लवकरच नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, एटीटी डेटा ही जपानस्थित बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. तसेच, जागतिक स्तरावर एनटीटी डेटा या कंपनीत सद्यस्थित १ लाख ९० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

त्याचबरोबर, भारतात एनटीटी डेटाचे जगातील दुसरे सर्वात मोठे कर्मचारी केंद्र असून भारत सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठदेखील आहे. गेल्या वर्षी, कंपनीने सांगितले होते की वाढत्या डेटा सेंटर व्यवसायात टॉपवर राहण्यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात सुमारे ३ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.