मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी! मालमत्ता करवाढ नाही
05 Feb 2024 15:52:03
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यातील महत्त्वपुर्ण निर्णय म्हणजे मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय पुढीलप्रमाणे :
१) मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही (नगरविकास विभाग)
२) राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. २ लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार. (कौशल्य विकास विभाग)
३) ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६५ वर्षावरील नागरिकांना लाभ देणार. (सामाजिक न्याय विभाग)
४) राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार. (नगर विकास विभाग)
५) उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार. (वन विभाग )
६) मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी. (उद्योग विभाग)
७) पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी. (वन विभाग)
८) बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. मूलभूत सुविधा देणार. (ग्राम विकास विभाग)
९) शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी. (सामान्य प्रशासन विभाग)
१०) धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार. (गृहनिर्माण विभाग)
११) सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते. (विधि व न्याय विभाग)