'त्या' आरोपीला फाशीची शिक्षाच व्हायला हवी!

हिंदू जनआक्रोश मोर्चातून सरकारकडे मागणी

    05-Feb-2024
Total Views |
Hindu Janaakrosh Morcha in Latur

लातूर :  
लातूरच्या वलांडी येथील एका सहा वर्षाच्या लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी आरोपीवर योग्य कारवाई होऊन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी हिंदू जनआक्रोश मोर्चातून करण्यात आली आहे.

वलांडीच्या एका सहा वर्षाच्या लहान मुलीवर अल्ताफ महेबूब कुरेशी नावाच्या निर्दयी आरोपीने ४ ते ५ दिवस अत्याचार केला होता. भारतीय दंड संहीता पोक्सो आणि अॅट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू समाजाकडून लातुरात बंदची हाक पुकारण्यात आली होती. व्यापारी वर्गानेही आपली दुकाने बंद ठेवत गंज गोलाईच्या श्री जगदंबादेवी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान झालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविला होता.

मोर्चादरम्यान महिलावर्ग आणि लहान मुलींसह दोन हजारांहून अधिक हिंदू बांधवांची उपस्थिती होती. एकूणच वलांडी येथील मुलीवर अत्याचार करणारा आरोपी, अक्कलकोटमधील हिंदु युवकाला अमानुष मारहाण करणारे तसेच कोल्हापूर येथील शालेय बसवर दगडफेक करणारे धर्मांध या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी या उद्देशाने हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.