कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ; मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर

    05-Feb-2024
Total Views |
Coal Production reached With a growth

नवी दिल्ली :
मागील वर्षाच्या तुलनेत एकूण कोळसा उत्पादनात यंदा जानेवारीमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. कोळसा मंत्रालयाने जानेवारी २०२४ मध्ये ९९.७३ दशलक्ष टन उत्पादनाचा टप्पा गाठल्याचे सांगतानाच कोळसा पाठवणीचा आकडा ६.५२ टक्क्यांच्या वाढीसह ८७.३७ एमटीवर पोहोचल्याचे म्हटले आहे.


दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) चे उत्पादन ७८.४१ एमटी वर पोहोचले असून मागील वर्षी ७१.८८ एमटी च्या तुलनेत यात ९.०९ टक्क्याने वाढ झाली आहे. तसेच, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाच्या एकत्रित कोळसा उत्पादनाने आतापर्यंत) ७८४.११ एमटी इतकी लक्षणीय झेप घेतली असून, चालू आर्थिक वर्षामधील ६९८.९९ एमटी उत्पादनाच्या तुलनेत यामध्ये १२.१८ टक्क्यांनी वाढ दिसून येत आहे.

सदर आकडेवारी कोळसा क्षेत्राची लवचिकता आणि देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्याची वचनबद्धता अधोरेखित करत असून कोळसा मंत्रालय या क्षेत्रातील शाश्वत विकास आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.