मुंबईकरांसाठी फक्त २५ हजार कोटी!; अर्थसंकल्पात २ लाख कोटींचे प्रकल्प

    05-Feb-2024
Total Views | 26
BMC Budget 2024 Mumbai City

मुंबई : 
मुंबई महापालिकेतर्फे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५९,९५४.७५ कोटी रुपये आकारमान असलेला आणि ५८.२२ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प दि. २ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला आहे. महापालिकेने या अर्थसंकल्पात, कोस्टल रोड, मलजल प्रक्रिया, जल शुद्धीकरण, समुद्राचे खारे पाणी गोडे करणे, नद्यांचे पुनरुज्जीवन यांसारख्या महत्वाच्या प्रकल्पांचा खर्च १ लाख ९९ हजार २८३ कोटी ६३ लाख इतका अंदाजित केला आहे. मात्र त्यासाठी अर्थसंकल्पात फक्त २५ हजार २३६ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अंतर्गत निधीमधून १६ हजार कोटी उभारणार

प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अंतर्गत निधीमधून ११,६२७.५४ कोटी अधिक ४,७९४.४८ कोटी रुपये असे एकूण १६,४२२.०२ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीचा पुरवठा वेळोवेळी न झाल्यास अथवा त्यास जेवढा उशीर होत जाईल, तेवढा प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार आहे. थोडक्यात म्हणजे प्रकल्प कामांसाठी आवश्यक लोखंड, सिमेंट, रेती, खडी, वाहतूक खर्च आदींमध्ये महागाई जसजशी वाढेल तसतसे खर्चात वाढ होणे स्वाभाविक असणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रकल्प खर्चाला हातभार लावण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी काही प्रमाणात तरी कर, दर वाढ आणि शुल्कवाढ करणे अपरिहार्य होणार आहे.

वास्तविक, मुंबई महापालिकेने राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक खर्च भागविण्यासाठी काही प्रमाणात तरी हजारो कोटींच्या निधीची मागणी करणे आवश्यक आहे. तरच मोठमोठे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागतील आणि वाढीव खर्चातही बचत करणे शक्य होईल.

मुंबई महापालिकेने हाती घेतलेले आणि प्रस्तावित काही मोठे प्रकल्प -:

पायाभूत प्रकल्प                                        रुपये कोटीत\
 
अर्थसंकल्प 'अ','ब' आणि ' ई ' चे दायित्व -: ४३९२५.५६ कोटी रु.
*अर्थसंकल्प' ग' दायित्व -: ८,९४० कोटी रु
* सांडपाणी प्रक्रिया -: ३१,८६८ कोटी रु.
* पिंजाळ धरण -: १४,३९० कोटी रु.
* कोस्टल रोड -: ४,७१४ कोटी रु.
* जल शुद्धीकरण -: ६००४. कोटी रु.
* समुद्राचे खारे पाणी गोडे करणे -: २,६४९ कोटी रु.
* गोरेगाव-मुलुंड लिंक रोड -: १४,८७४ कोटी रु
* आश्रय योजना -: ४,०६० कोटी रु.
* घनकचरा - एनर्जी -: १,६०६ कोटी रु.
* मिठी नदी विकास -: ३,५७० कोटी रु.
* नद्यांचे पुनरुज्जीवन -: २,४५५ कोटी रु.
* दहिसर- मिरा रोड -: ३,९१० कोटी रु.
* वर्सोवा- दहिसर कोस्टल रोड -: ३४,६३० कोटी रु.
* जलवहन बोगदे. -: १०,७४० कोटी रु.
* देवनार भूखंड विकास -: १,४११ कोटी रु.
* विक्रोळी भूखंड विकास -: ७६० कोटी रु.
* विक्रोळी इंजिनियरिंग हब -: ३८६ कोटी रु.
* पांजरापूर जलशुद्धीकरण -: २५०० कोटी रु.
* नायर रुग्णालय विकास -: ३०७ कोटी रु.
* भगवती रुग्णालय विकास -: २८२ कोटी रु.
* भांडूप सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय -: ७१७ कोटी रु.
* सायन रुग्णालय विकास -: ५७६ कोटी रु.
* सायकल ट्रॅक -: १८७ कोटी रु.
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121