मध्य चिलीतील जंगलात भीषण आग, ४६ जणांचा मृत्यु

    04-Feb-2024
Total Views |
massive-forest-fire-in-central-chile

नवी दिल्ली :
दक्षिण अमेरिकेतील चिली येथे जंगलाला भीषण आग लागली. ही आग मध्य चिलीमधील सुमारे १ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या वलपरिसो प्रदेशातील अनेक भागांत धुराचे लोट पाहावयास मिळाले. दरम्यान, या आगीत किमान ४६ लोकांचा मृत्यु झाला आहे, असे चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी सांगितले.

दरम्यान, या आगीमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ट्रक वापरून अग्निशामक ज्वाला याद्वारे आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच, विना डेल मार या किनारपट्टीच्या पर्यटन शहराच्या आसपासच्या भागांना सर्वात जास्त फटका बसला असून बचाव पथके सर्व प्रभावित भागात पोहोचण्यासाठी धडपडत आहेत, असे चिलीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.