शुभमन गिलची शतकी खेळी; दुसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत

    04-Feb-2024
Total Views |
ind vs eng test match vishakhapattam

मुंबई :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. शुभमन गिलने दुसऱ्या डावात दमदार शतक ठोकले असून भारताने इंग्लंडवर आघाडी घेतली आहे. गिलने १४७ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली. यात ११ चौकर व २ षटकारांचा समावेश आहे.


दरम्यान, दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फंलदाजीचा निर्णय घेत सामन्यावर पकड घेतली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात केवळ २५३ धावा केल्या आहेत. भारताने पहिल्या डावात ३१३ धावांच्या बदल्यात दुसऱ्या डावाच्या सुरूवातीला १४३ धावांची बहुमुल्य आघाडी घेतली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.