भारत विरुध्द इंग्लंड कसोटी सामना; इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य

    04-Feb-2024
Total Views |
ind vs eng 2nd test match england 399 target to win

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले आहे. दुसरा कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड असून आणखी २ दिवसांचा खेळ बाकी आहे.
  
 
भारताकडून पहिल्या डावात सलामीवीर यशस्वी जयस्वालने २०९ धावांची द्विशतकी खेळीच्या जोरावर ३९६ धावसंख्या उभी केली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर आटोपला. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताकडे १४३ धावांची बहुमुल्य आघाडी घेतली होती.

दरम्यान, दुसऱ्या डावात भारताकडून शुभमन गिलने दुसऱ्या डावात दमदार शतक ठोकले. भारताने इंग्लंडवर आघाडी घेतली असून गिलने १४७ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली. यात ११ चौकर व २ षटकारांचा समावेश आहे. एकंदरीत, भारताला विजयासाठी इंग्लंडच्या संघाला ३९९ धावांच्या आत रोखणे गरजेचे असेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.