युनियन बँकेतील विविध रिक्त जागांसाठी मेगाभरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज

    04-Feb-2024
Total Views |
Union Bank Recruitment 2024

मुंबई :  '
युनियन बँक' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. युनियन बँकेकडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार युनियन बँकेतील एकूण ६०६ विविध रिक्त पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

मुख्य व्यवस्थापक-आयटी
वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी
व्यवस्थापक-आयटी
व्यवस्थापक
सहायक व्यवस्थापकशैक्षणिक पात्रता -

बी.एससी., बी.ई., बी. टेक पदवीधर
कुठल्याही शाखेतील पदवीधरवयोमर्यादा -

३०-४५ वर्षे


युनियन बँकेतील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.


उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून दि. २३ फेब्रुवारी २०२४ असेल. 
भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 
अर्ज शुल्क -

जनरल, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.