सरकारी नोकरीची करायचीय! कंपनीमध्ये ‘या’ पदासाठी अर्ज मागविण्यास सुरूवात, आजच अर्ज करा

    04-Feb-2024
Total Views |
THE NEW INDIA ASSSURANCE COMPANY LIMITED

मुंबई :
'द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात 'द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड'कडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील एकूण ३०० रिक्त पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
 

पदाचे नाव -

असिस्टंट (३०० जागा)


शैक्षणिक पात्रता -

मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर.


वयोमर्यादा -

२१ ते ३० वर्षे


अर्ज शुल्क -

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ८५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

 
'द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड'तील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहे.
 
उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि. १५ फेब्रुवारी २०२४ असेल. 
 
भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 'द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

'द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड'चे अधिकृत वेबसाईट पाहण्याकरिता येथे क्लिक करा

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.