"शाळा शिकण्यासाठी आहेत, धर्मप्रचारासाठी नाहीत"

हिजाबवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी मुस्लिम मुलगी बसली उपोषणाला

    04-Feb-2024
Total Views |
Tanzim Merani 
 
जयपूर : कर्नाटकानंतर आता राजस्थानमध्ये हिजाब बंदीची मागणी वाढत आहे. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनीही शाळांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आता मुस्लीम समाजातील गुजरातमधील तंजीम मेरानी गेल्या तीन दिवसांपासून शाळांमध्ये हिजाबवर बंदी आणण्यात यावी यासाठी उपोषणाला बसली आहे.
 
हिजाब बंदी घालण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेला तन्झिम म्हणाल्या की, "लोक शिकण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये जातात, धर्माचा प्रचार करण्यासाठी नाही. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घातली पाहिजे." त्यांनी केलेल्या मागणीनंतर त्यांना कट्टरपंथीयांनी धमक्या सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे.
 
कट्टरपंथीयांनी दिलेल्या धमक्यावर विचारण्यात आलेल्यावर तन्झिम म्हणाल्या की, मी धमक्यांना घाबरत नाही. यापूर्वीही त्यांच्याविरोधात अनेक फतवे निघाले होते. तरीही माझे आंदोलन देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर पूर्ण बंदी घालून समान नागरी संहिता लागू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील"
 
पुढे बोलताना त्या म्हणाला की, “मी मुस्लिम समाजातून आलेली आहे. याचा अर्थ असा नाही की मी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये हिजाब घालावा. त्यामुळे राजस्थानमधून हिजाबविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले असून ते संपूर्ण देशात चालणार आहे."
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.