मृत व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करुन रोहिंग्या मिळवत आहेत भारताचे नागरिकत्व!

    04-Feb-2024
Total Views |
 Rohingya
 
नवी दिल्ली : बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर देशासाठी घातक बनत आहेत. ते केवळ बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करून काम करत नाहीत, तर स्वत:ला या देशाचे रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आधार आणि मतदार कार्डसारखी बनावट कागदपत्रे बनवत आहेत. यासाठी त्यांनी मृत झालेल्या व्यक्तींची ओळख घेण्यास सुरुवात केली आहे.
 
रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर भारतातील विविध राज्यांमध्ये लपून बसले आहेत आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी मरण पावलेल्या लोकांची ओळखपत्रे वापरत आहेत. हे घुसखोर या नावांनी आपला धंदा तर चालवत आहेतच पण बँकांमध्ये खातीही उघडली आहेत. अशी प्रकरणे समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
 
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) सह भारतातील इतर एजन्सींना नुकतेच असे अनेक पुरावे सापडले आहेत, ज्यामध्ये त्यांना बेकायदेशीरपणे भारतात आणून वेगवेगळ्या राज्यात स्थायिक करणारी टोळी सापडली आहे. अशा लोकांची ओळख पटवली जात आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून काही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांनाही अटक करण्यात आली आहे.
 
अलीकडेच, यूपी एटीएसने परदेशी निधी घेऊन अवैध घुसखोरांना मदत करणाऱ्या सिंडिकेटशी संबंधित काही लोकांना अटक केली होती. या टोळीचा सक्रिय सदस्य आणि बांगलादेशचा रहिवासी असलेला मोहम्मद रशीद अहमद, कानपूरमधून पकडला गेला, त्याने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने बनावट कागदपत्रांच्या मदतीने ओळख बदलून इतर पाच बांगलादेशींना देवबंदमध्ये आश्रय दिला होता.
 
यापूर्वी पकडलेल्या बांगलादेशी आदिलुर रहमानलाही रशीदने बनावट कागदपत्रे दिली होती. एटीएसने अलीकडेच अबू सालेह मंडल याला विदेशी निधी मिळवून देणारा आणि एनजीओ चालवणारा मास्टरमाइंड याला लखनौ येथून अटक केली होती. तो त्याच्या एनजीओमध्ये परकीय निधी घेत असे आणि अवैध घुसखोरांना भारतात स्थायिक होण्यास मदत करत असे.
 
या सर्व फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर २०२३ पासून जन्म-मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. आता मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मृत व्यक्तीचे आधार कार्ड द्यावे लागणार आहे. यानंतर संबंधित अधिकारी त्या आधार कार्डची माहिती यूआयडीएआयकडे पाठवेल. यानंतर यूआयडीएआय मृत व्यक्तीचे आधार निष्क्रिय करेल आणि त्याचे नाव सर्वत्र काढून टाकले जाईल.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.