ठाकरेंना सभेसाठी लोकं जमवायला अडचण? राणे म्हणाले, "हवं तर आम्ही...."

    04-Feb-2024
Total Views |

Uddhav Thackeray


सिंधुदुर्ग :
उद्धव ठाकरे तुम्हाला लोकं जमवायला अडचण येते हे आम्हाला माहिती आहे. हवं तर आम्ही मदत करु. पण योग्य ठिकाणी सभा घ्या, असा सल्ला भाजप नेते निलेश राणेंनी दिला आहे. उद्धव ठाकरे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून ते कुडाळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे लोकांची अडचण होत असल्याने त्यांनी मोकळ्या मैदानावर सभा घ्यावी, असे निलेश राणे म्हणाले आहे.
 
निलेश राणे म्हणाले की, "उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. कुडाळ शहरातून त्यांचा दौरा सुरु होईल. कुडाळ शहरात बाजारपेठेच्या ठिकाणी त्यांनी सभा आयोजित केली आहे. त्याठिकाणी आधीच ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. एवढ्या गर्दीत सभा घेऊन त्यांना काय साध्य करायचं आहे माहिती नाही. पण लोकांना त्यातून त्रास होणार आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "तुम्ही एका गटाचे प्रमुख आहात. तुम्ही मोठ्या मैदानात किंवा मोठ्या हॉलमध्ये सभा घेतली पाहिजे. जिथे गर्दी आहे त्या ठिकाणी सभा घेतली तर त्याठिकाणी ते अडचणीचे ठरणार. आम्ही कुडाळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहोत. जर कुठला प्रमुख येत असेल तर त्यांनी एखाद्या मैदानात सभा घ्यायला हवी. तुम्हाला लोकं जमवायला अडचण येते हे आम्हाला माहिती आहे. हवं तर आम्ही मदत करु. आम्ही लोकं पाठवू. पण लोकांची अडचण करु नका. योग्य ठिकाणी सभा घ्या. लोकांना अडचण होईल असं काहीही करु नका," असेही ते म्हणाले आहेत.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.