'नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता भरती सुरू

    04-Feb-2024
Total Views |
National Aluminium Company Limited Recruitment

मुंबई :
'नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड' अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात 'नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड'कडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार नॅशनल अॅल्युमिनियम कंपनीतील एकूण ४२ विविध रिक्त पदे भरतीद्वारे भरली जाणार आहेत. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

ज्युनिअर फोरमन (३२ जागा)

प्रयोगशाळा सहाय्यक (२ जागा)

ड्रेसरसह प्रथम सहायक (४ जागा)

परिचारिका (४ जागा)


शैक्षणिक पात्रता -

परिचारिका या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंगमध्ये डिप्लोमा, बी.एससी पदवी असणे आवश्यक.

ड्रेसरसह प्रथम सहायक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त महाविद्यालयामधून उच्च माध्यमिक शिक्षण आवश्यक.

प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे केमिस्ट्री हा विषय घेऊन बी. एससी पदवी असणे आवश्यक.

ज्युनिअर फोरमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खाण किंवा खाण इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणे आवश्यक.


वयोमर्यादा -

३०-४० वर्षे
 
वेतनमान - 

३६,५००- १,१५,००० रुपये 


'नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड'तील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
 
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. १८ फेब्रुवारी २०२४ असेल.
 
भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 'नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


अर्ज शुल्क -

जनरल, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे.


'नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड'चे अधिकृत वेबसाईट पाहण्याकरिता येथे क्लिक करा
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.