नानावटी मॅक्स कॅन्सर जनजागृती बाइकर रॅली!

    04-Feb-2024
Total Views |
Nanavati Max Biker Rally Cancer Awareness

मुंबई :
नानावटी मॅक्सच्या वतीने कॅन्सर जनजागृतीसाठी बाईकर रॅली आयोजित करण्यात आली होती. दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नानावटी मॅक्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे कॅन्सर जनजागृती बाईक रॅली रोझनो परेरा (बायकर्स कौज फॉउंडेशन ) यांच्या पुढाकारने आयोजित करण्यात आली होती.

सदर जनजागृती रॅली साठी मुंबई च्या विविध भागातून २५०हुन अधिक बाईक स्वार सहभागी झाले होते अर्थातच नेहमीप्रमाणे टीम थम्पिंग रायडर्स चे संचालक प्रशांत गोरीवले, रेणुका नाटके, सहसंचालक जावेद चौहान, विकास जाधव , महंत मांजरेकर, हेमंत पाटील मुंबई , ठाणे , डोंबिवली चे बाईक स्वार देखील उपस्थित होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बॉलीवूड अभिनेते बॉबी देवल यांची उपस्थिती लाभली होती.

सकाळी ०८:०० वाजता बाईकर्स आणि पाहुण्यांचे आगमन झाले उपस्थित बाईकर्स नी झुमा व्यायाम करून इतर मनोरंजन कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बॉलिवूड सुपर स्टार  बॉबी देवल यांनी संबोधन केले आणि डॉक्टरांसोबत ध्वज दाखवून नानावटी मॅक्स हॉस्पिटलपासून बाईक रॅली सुरु केली आणि सुमारे २२ किमीचे अंतर कापून बाईकर्स हॉस्पिटलला परत आले. त्यानंतर त्यांना स्नॅक्स आणि रिफ्रेशमेंट देण्यात आली कार्यक्रमात हेल्थ टॉक सुद्धा घेण्यात आले सदर रॅली चा मूळ उद्धेश समाजामध्ये कॅन्सर प्रति जनजागृती निर्माण करणे हा होता.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.