मुंबईत पुन्हा रंगणार महापौर चषक स्पर्धा!

क्रीडा महाकुंभ दरम्यान पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

    04-Feb-2024
Total Views |
Mayer Trophy Competition in Mumbai City

मुंबई :
शहरात पुन्हा एकदा महापौर चषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी क्रीडा महाकुंभ स्पर्धेच्या निमित्ताने यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, कोविड कालावधीत बंद पडलेला महापौर चषक पुन्हा एकदा येत्या दोन महिन्यात मुंबईकरांसाठी सुरू करणार असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.




दरम्यान, दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेतील, स्पर्धकांचा उत्साह विविध खेळांमुळे द्विगुणित झाला असतानाच मंत्री लोढा म्हणाले, पार्कमधील लंगडी स्पर्धेदरम्यान या क्रीडा महाकुंभची संकल्पना आखण्यात आली आहे. यावेळी मंत्री लोढा यांच्यासोबत मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे देखील उपस्थित होते.

दि. २६ जानेवारी रोजी सुरु झालेला हा क्रीडा महाकुंभ पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून स्पर्धेत स्पर्धकांकडून उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला जात आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, मनपा शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, माजी नगरसेविका अक्षता तेंडुलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच क्रीडा प्रेमींनी ही यावेळी हजेरी लावली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.