अल्पवयीन मुलांची क्रूरता! दर्ग्याजवळ चरणाऱ्या गाईंवर टाकले अॅसिड

    04-Feb-2024
Total Views |
 cow
 
गांधीनगर : गुजरातमधील वडोदरा येथील एका दर्ग्याजवळ काही अल्पवयीन मुलांनी दोन गायींवर ॲसिड टाकून त्यांना जाळले. या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलांनी आधी तेथून जाणाऱ्या गायींना घेरून त्यांचा छळ केला आणि नंतर त्यांच्यावर ॲसिड टाकल्याचे बोलले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वडोदरातील गोरवा भागात घडली. येथे गोरवा बापूंच्या दर्ग्याजवळ ५ अल्पवयीन मुलांनी दोन गायींना घेरून त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर त्या मुक्या प्राण्यांवर ॲसिड फेकण्यात आले. यातील एक गाय ॲसिड हल्ल्यातून वाचली, मात्र दुसरी गंभीर जखमी झाली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्पवयीन मुलांनी त्यांच्यासोबत ॲसिड आणले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे ॲसिड वाहनातून बाहेर काढले आणि जमिनीवर काही ॲसिड टाकल्यानंतर ते गायींवर टाकल्याचे सांगितले. ही घटना शुक्रवारी (२ फेब्रुवारी २०२४) रात्री साडेआठच्या सुमारास गोराव दर्गा परिसरातील आयटीआय चौकाजवळ घडली.
 
गायींवर ॲसिड फेकल्यावर त्या घाबरून इकडे तिकडे धावू लागल्या. या गायी पळताना पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. गायींवर झालेल्या हल्ल्यानंतर सुनील लिंबाचिया नावाच्या व्यक्तीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसात खून आणि प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गोरवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी माहिती गोळा करून या पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. नंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या अल्पवयीन मुलांनी ही घटना स्वतः केली की त्यांच्यामागे अन्य कोणी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.