कॅन्सरग्रस्त रुग्णांना फळवाटप! 'द अँकर फाऊंडेशन'चा सामाजिक उपक्रम

    04-Feb-2024
Total Views |

The Anchor Foundation


मुंबई :
मुंबईतील 'द अँकर फाऊंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान आणि फळवाटप करण्यात येते. जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने ४ फेब्रुवारी रोजीसुद्धा मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवण्यात आला असून अनेक गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्यात आले.
 
सचिन सोनवणे हे द अँकर फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक असून संस्थेच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज न चुकता दोनदा अन्नदान आणि फळवाटप केले जाते.
 
या संस्थेद्वारे मागील वर्षीच्या दिवाळीत डहाणू-पालघर येथील आदिवासी पाड्यामध्ये ४०० वनवासी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याशिवाय कोरोना काळात भाड्याच्या घरात राहणाऱ्या ७०० कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतके राशन किटही वाटण्यात आले. तसेच डिसेंबर महिन्यात शांतीलाल संघवी आय हॉस्पीटलसोबत नेत्र चिकित्सा शिबीर भरवण्यात आले असून अँकर फाऊंडेशनतर्फे ५० जेष्ठ नागरिकांचे मोफत मोतीबिंदुचे ऑपरेशन करण्यात आले.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.