"गडचिरोली बदल रहा है, बदलाव दिख रहा है!"

महामॅरेथॉनमध्ये फडणवीसांनी घेतला सहभाग

    04-Feb-2024
Total Views |

Fadanvis


नागपूर :
गडचिरोलीला आता कुणीही थांबवू शकत नाही. गडचिरोली बदल रहा है, बदलाव दिख रहा है, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गडचिरोली पोलिस विभागाच्या वतीने तिथे महामॅरैथॉन आयोजित करण्यात आली असून उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गडचिरोलीमध्ये पोलिस विभागाने खूप चांगलं महामॅरेथॉनचे आयोजन केले असून याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हजारों लोक या मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. गडचिरोलीला आता कोणी थांबवू शकत नाही, असा संदेश येथील तरुणाईने दिला आहे. या तरुणाईचा हुंकार या महामॅरेथॉनमधून पाहायला मिळाला आहे. गडचिरोली बदल रहा है," असे ते म्हणाले.


Fadanvis 
तसेच आज मोठ्या प्रमाणात गडचिरोलीचे परिवर्तन होत आहे, असेही ते म्हणाले. या महामॅरेथॉनमध्ये हजारों तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.