नानावटी मॅक्स हॉस्पिटलद्वारे कॅन्सर जनजागृती बाईकर रॅली!

    04-Feb-2024
Total Views |

Bikers Rally


मुंबई :
दिनांक ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी नानावटी मॅक्स मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे कॅन्सर जनजागृती बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. सदर जनजागृती रॅलीसाठी मुंबईच्या विविध भागातून २५० हून अधिक बाईक स्वार सहभागी झाले होते.
 
नेहमीप्रमाणे टीम थम्पिंग रायडर्सचे संचालक प्रशांत गोरीवले, रेणुका नाटके, सहसंचालक जावेद चौहान, विकास जाधव, महंत मांजरेकर, हेमंत पाटील यांसह मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीचे बाईक स्वार देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते बॉबी देवल यांची उपस्थिती लाभली होती. नानावटी मॅक्स हॉस्पिटलपासून या बाईक रॅलीला सुरुवात झाली आणि सुमारे २२ किलोमीटरचे अंतर कापून बाईकर्स हॉस्पिटलला परत आले. सदर रॅलीचा मूळ उद्धेश समाजामध्ये कॅन्सर आजाराप्रति जनजागृती निर्माण करणे हा होता.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.