२०३०-३१ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर राहणार ६.७ टक्के

03 Feb 2024 16:16:34
average-growth-rate-of-indian-economy

नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून नुकताच अंतरिम अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नसल्या तरी वित्तीय तूट स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेची सरासरी वाढ २०३०-३१ पर्यंत ६.७ टक्के राहील असा अंदाज रेटिंग एजन्सी क्रिसिलने वर्तविला आहे.

दरम्यान, क्रिसिलच्या अंदाजानुसार, या दशकाच्या अखेरीस भारतीय अर्थव्यवस्थेचा सरासरी वार्षिक दर हा ६.७ टक्के राहील. तसेच, क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पुढील ७ वर्षांत अर्थव्यवस्था ६.७ टक्क्याने वाढेल. हा दर कोव्हिड काळातील सरासरी वाढीच्या दरापेक्षा किंचित जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

'क्रिसिल'च्या मते, बांधकाम उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सरकारने भांडवली खर्चात लक्षणीय वाढ केली आहे आणि राज्यांच्या गुंतवणुकीच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देऊ करत आहे, असे अहवालात म्हटले आहे. तसेच, आरबीआयकडून व्याजदर वाढीसंदर्भात सावध राहील, कारण महागाई चार टक्क्यांच्या पातळीवर आणण्याचा आरबीआयचा प्रयत्न असेल.

Powered By Sangraha 9.0