यशस्वी घोडदौड! दुहेरी शतक ठोकत मोडला गावस्कर-कांबळींचा रेकॉर्ड

03 Feb 2024 17:08:10
Yashasvi Jaiswal notched up his Double Hundred

नवी दिल्ली :
भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहेत. भारताने प्रथम फंलदाजीचा निर्णय घेत डावाला सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याने द्विशतकी खेळी रचत विनोद कांबळी, सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे.


दरम्यान, २२ वर्षीय जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. त्याने १९९३ मध्ये विनोद कांबळीने केलेला विक्रम मोडीत काढत सर्वात युवा भारतीय द्विशतकवीर होण्याच बहुमान पटकावला आहे. तसेच, कांबळीपूर्वी महान फलंदाज सुनील गावस्कर हे दीर्घकाळ द्विशतक करणारा भारताचा सर्वात तरुण फलंदाज ठरले होते.

Powered By Sangraha 9.0