कॅनडात दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या मित्राच्या घरावर गोळीबार!

03 Feb 2024 17:59:00

Hardeep singh Nijjar


ओटावा :
कॅनडातील दक्षिण सरे येथील सिमरनजीत सिंग नावाच्या खलिस्तान समर्थकाच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला असून रात्रभर गोळीबार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सिमरनजीत सिंग हा खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरचा मित्र होता. हा हल्ला अमली पदार्थांच्या तस्करीबाबत टोळीयुद्ध असल्याचेही बोलले जात आहे. त्याचवेळी अमेरिकेत दोन खलिस्तान समर्थक गटांमध्ये हाणामारी झाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार झालेले घर सिमरनजीत सिंग याचे असून तो मृत हरदीप सिंग निज्जर याचा मित्र होता. हरदीप सिंग निज्जरशी असलेल्या संबंधांमुळेच हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये हरदीप सिंह निज्जर याची सरे शहरात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केला होता. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Powered By Sangraha 9.0