...अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारतपुत्राचा गौरव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

03 Feb 2024 14:49:38

Lalkrishna Advani & Shinde


मुंबई :
अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारतपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे, आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले.
 
"प्रखर राष्ट्रभक्त अडवाणीजींनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारणासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर व्हावे, हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे," असे ते म्हणाले.
 
"उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे," असे अभिष्टचिंतन करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते आडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले आहे.



Powered By Sangraha 9.0