देशाच्या विकासात लालकृष्ण अडवाणींचे अविस्मरणीय योगदान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

03 Feb 2024 13:39:21

Fadanvis & Lalkrushna Advani


मुंबई :
भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देशाच्या विकासात लालकृष्ण अडवाणींचे योगदान अविस्मरणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, "आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांना भारताचा सर्वोच्च सन्मान, भारतरत्न घोषित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा."

 
"देशाच्या विकासात तुमचे योगदान अविस्मरणीय आहे. आपल्या सर्वांचा सांस्कृतिक वारसा असलेल्या प्रभू श्री राम मंदिर चळवळीसाठी तुमचा संघर्ष सदैव स्मरणात राहील. तुमचे संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित होते आणि तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहात," असेही फडणवीस म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0