शेतकरी आंदोलन! पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार?

29 Feb 2024 12:18:22

 Farmers Movement

चंदीगढ : शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हरियाणा पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आणि बॅरिकेड्स तोडणाऱ्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट आता रद्द करण्यात येणार आहेत. हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर अशांतता पसरवणाऱ्यांवर पोलीस मोठी कारवाई करणार आहेत. अशा हल्लेखोरांची ओळख पटली आहे.
 
हरियाणाचे पोलीस अधिकारी डीएसपी जोगिंदर शर्मा म्हणाले की, “मी माध्यमांद्वारे सांगू इच्छितो की शेतकरी आंदोलनात पंजाबमधून हरियाणामध्ये येणारे, अडथळे तोडणारे किंवा गोंधळ घालणारे सर्व हल्लेखोरांना अटक करण्यात यावी. आम्ही त्यांना चिन्हांकित केले आहे. त्यांची ओळख आमच्या ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. "आम्ही या लोकांविरुद्धची ओळखपत्र आमच्या पासपोर्ट कार्यालयात आणि दूतावासाकडे पाठवू आणि व्हिसा आणि पासपोर्ट दोन्ही रद्द करण्याची मागणी करू."
 
 आपण हे वाचलंत का? - "पाकिस्तान आमच्यासाठी शत्रू राष्ट्र नाही. ते तर..."; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचे वादग्रस्त विधान
 
हल्लेखोरांचीओळख पटवण्याबाबत ते म्हणाले, “आम्ही अनेक छायाचित्रे घेतली आहेत ज्यात काही लोक तोडफोड करत आहेत आणि गोंधळ घालत आहेत. त्यांची नावे आणि पत्ते काढल्यानंतर, आम्ही त्यांना पासपोर्ट आणि व्हिसा कार्यालयात पाठवत आहोत आणि ते रद्द करू.”
 
विशेष म्हणजे पंजाबमधील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून हरियाणा आणि पंजाबच्या खन्नौरी आणि संभू सीमेवर तळ ठोकून आहेत. हे शेतकरी दिल्लीला जाण्याची मागणी करत आहेत. हरियाणा पोलिसांनी त्यांना येथे रोखले आहे. यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले असून ड्रोनच्या सहाय्याने त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.
 
आपण हे वाचलंत का? -  अखेर संदेशखालीचा कसाई पोलिसांच्या ताब्यात!
 
शेतकरी आंदोलनात देशासाठी अराजक असलेल्या तत्वांचा सहभाग आहे, असा आरोप करण्यात येत आहे. ते दगडफेक करून हरियाणा पोलिसांचे ड्रोन उद्ध्वस्त करत आहेत. हरियाणा पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही तोडत आहेत. या हल्लेखोरांमुळे आतापर्यंत ३० हून अधिक हरियाणा पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. येथे दोन पोलिसांचाही मृत्यू झाला आहे.
 
शेतकरी आंदोलन संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) ही संघटना करत आहे. त्यांना दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. ते दिल्लीत जाऊन एमएसपीच्या हमीसह इतर अनेक मागण्या करत आहेत. त्यांनी केंद्र सरकारशी अनेकदा चर्चाही केली आहे, मात्र कोणताही करार झालेला नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0