'एक वाहन एक फास्टटॅग' मोहीम पुढे ढकलली जाण्याची शक्यता

29 Feb 2024 14:28:39

Paytm fastage payment
 
मुंबई: पेटीएम फास्टटॅग प्रकरणानंतर नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएसआय) ने प्रस्तावित एक वाहन एक फास्टटॅग मोहिमेचे अनावरण पुढे ढकलले आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, मंडळ वन व्हेईकल वन फास्टटॅग ही मोहिम मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा विचारात आहे. पेटीएम ग्राहकांच्या फास्टटॅग वापरण्याच्या गैरसोयीमुळे हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फास्टटॅग केवायसीची यापूर्वी अंतिम तारीख २९ फेब्रुवारी होती परंतु ती आता मार्चपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. तांत्रिकदृष्ट्या पेटीएम ग्राहकांना हायवेवर फास्टटॅगसाठी अडचण येत होती.
 
याविषयी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, 'पेटीएमवरील संकटामुळे फास्टटॅग युजरसाठी आम्ही केवायसीची मुदत वाढवत आहोत.' असे म्हटले आहे.
 
 
वन व्हेईकल वन इनिशिएटिव्ह पुढाकार म्हणजे नक्की काय?
हे धोरण एनएचएआयने इलेक्ट्रोनिक टोल कलेक्शन वाढवण्यासाठी अवलंबले आहे. टोल प्लाझावरील सुरळीत कामकाजासाठी हा धोरणात्मक निर्णय एनएचएआयने घेतला. प्रत्येक वाहनांसाठी स्वतंत्र फास्टटॅग न वापरता याशिवाय एका वाहनांसाठी अनेक फास्टटॅग वापरण्यास परावृत्त करण्यासाठी हा निर्णय मंडळाने घेतला होता.
 
याआधी आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहक व व्यापारी यांना पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेत पैसे जमा करण्याचे सूचित केले. या बचत खाते, चालू खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, फास्टटॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड यातील पैसे विनापरवानगी काढू शकतात असे सांगण्यात आले होते. फास्टटॅग टेक्नॉलॉजीमार्फत इलेक्ट्रोनिक टोल कलेक्शन प्रणालीत आमूलाग्र बदल झाला आहे. रेडिओ फ्रिकवेन्सी आयडेंटिफिकेशनमुळे लिंक प्रिपेड खात्यातून टोलचे पैसे भरता येतात.
 
Powered By Sangraha 9.0