नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजना देशभरात किती यशस्वी ठरली आहे याबद्दल माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी घर देण्याचा संकल्प पूर्ण होत आहे. या योजनेच्या मार्फत आतापर्यंत मोदी सरकारने ३ कोटींहून अधिक घरे बांधली आहेत. या योजनेमुळे देशभरात किती लोकांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशात आतापर्यंत ४.१२ कोटी घरांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ३ कोटी घरांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. तर उर्वरित घरांचे बांधकाम सुरु असून या घरांचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल. तसेच, ग्रामीण भागात या योजनेचे ४४% लाभार्थी दलित किंवा आदिवासी समाजातील आहेत.
जगातील प्रत्येक माणसाच्या प्राथमिक गरजांपैकी एक म्हणजे स्वतःचे घर. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेतून देशभरातील विविध शहरात घरे बांधून नागरिकांना याचा लाभ दिला गेला आहे. त्याचबरोबर, ग्रामीण भागातील विटांच्या घरांच्या जागी सरकारी योजनेच्या माध्यमातून छतांची घरे बांधून देण्यात आली आहेत. यासर्वांत प्रधानमंत्री आवास योजनेची सर्वात मोठी भूमिका आहे.