आयुष्याला ध्रुव बनविलं तर ‘राठी’ नव्हे तर ‘जुरेल’ व्हा, असे नेटिझन्स का म्हणाले वाचा सविस्तर

28 Feb 2024 19:01:21
Dhruv Jurel

नवी दिल्ली :
भारत व इंग्लंड यांच्यात रांची येथे चौथा कसोटी सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने चमकदार कामगिरी केली होती. तो सामनावीर देखील ठरला होता. दरम्यान, टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज जुरेल हा हनुमान भक्त असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, कसोटी सामन्यातील चमकदार कामगिरीची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आता त्याच्या कामगिरीविषयी जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नेटिझन्समध्ये अशीही चर्चा सुरू आहे की, त्याची खेळी लक्षात घेता ज्युरेल नसता तर भारताचा सामना हरला असता.

तसेच, चाहते, क्रिकेट रसिकांच्या कौतुकानंतर सोशल मीडियावर त्याचे ट्विटही व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'जय बजरंगबली' असे लिहिल्याचे दिसत आहे. एका युझरने म्हटले आहे की, “तुमचे ट्विट वाचून अभिमान वाटतो. आम्हाला वाटले की तुम्ही बदलून इतरांसारखे धर्मनिरपेक्ष व्हाल पण तुम्ही आम्हाला अभिमान वाटला. भारतीय क्रिकेट संघात तुम्ही काहीतरी मोठे कराल. जय बजरंगबली."

इंग्लंडविरुध्दच्या चौथ्या कसोटी सामन्यात जुरेलची चमकदार कामगिरी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळविला गेला. टीम इंडियाने हा सामना 5 विकेटने जिंकला. इंग्लंडने दुसऱ्या डावात भारतीय संघासमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते कर्णधार रोहित शर्माचे आक्रमक अर्धशतक आणि शुभमन गिलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने सामना जिंकला. यादरम्यान शुभमन गिल नाबाद ५२ धावा तर ध्रुव जुरेल नाबाद ३९ धावा करत सामन खिशात घालत कसोटी मालिका जिंकली.

Powered By Sangraha 9.0