सुसंस्कृत, समर्पित आणि सुरक्षित हिंदू समाजनिर्मितीसाठी विहिंप सज्ज!
27 Feb 2024 18:15:02
(VHP Press Conference)
लखनौ : "प्रत्येक व्यक्तीच्या अंतरात्म्यात श्रीरामाची मूल्ये पुन्हा प्रस्थापित करून विहिंप एक सुसंस्कृत, समर्पित आणि सुरक्षित हिंदू समाज निर्माण करेल." असे विश्व हिंदू परिषदे नवनिर्वाचित केंद्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा यांनी म्हटले.
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि प्रबंध समितिची तीन दिवसीय बैठक (२५,२६,२७ फेब्रुवारी) मंगळवारी अयोध्या धामच्या कारसेवकपुरम येथे संपन्न झाली. देशाच्या सद्यस्थितीवर चर्चा करून हिंदू समाजासमोरील आव्हाने आणि संघटनेच्या विस्ताराच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी बजरंग लाल बागडा यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी विहिंपचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार आणि संयुक्त महामंत्री डॉ. सुरेन्द्र जैन हे देखील उपस्थित होते.
बजरंग लाल बागडा यावेळी म्हणाले, "प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर बांधले गेले आहे. आता परदेशात संघटना, समाज आणि हिंदूंमध्ये रामत्वाचा प्रसार करून सुसंस्कृत आणि सशक्त समाजाची पुनर्स्थापना करू. असा देश-विदेशातील प्रतिनिधींनी एकमताने बैठकीत संकल्प केला. त्यासाठी विहिंपच्या षष्ठीपूर्ती वर्षाच्या अखेरीस संघटनेच्या कार्याचा देशभरात सुमारे एक लाख ठिकाणी विस्तार करण्याचे ठरले आहे."
उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू केल्याबद्दल विहिंपने उत्तराखंड सरकारचे अभिनंदन केले आहे. त्यासोबतच उर्वरित राज्यंही मजबूत समान नागरी संहिता आणतील अशी आशा व्यक्त केली. धर्मांतर रोखण्यासाठी काही राज्यांनी कठोर कायदे केले आहेत, इतर राज्यांनीही याबाबतीत पुढे जावे, असे मत बजरंग लाल बागडा यांनी व्यक्त केले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करत ते म्हणाले, "सीएएचे नियम जारी होताच विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानकडून धर्माधारित अत्याचाराला बळी पडलेल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध बांधवांच्या नागरिकत्वाबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे."
सेवा कार्याचा विस्तार, गोरक्षण आणि गोसंवर्धन याबरोबरच धर्मांतर थांबवून घरवापसीच्या कामाला अधिक गती देण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. परदेशात राहणाऱ्या हिंदूंशी संपर्क आणि समन्वय मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी अनेक देशांतील प्रतिनिधींनी आपली कृती योजना सांगितली.
बैठकीदरम्यान झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेअंतर्गत आलोक कुमार यांची आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, बजरंग लाल बागडा यांची केंद्रीय महामंत्री, मिलिंद परांडे यांची विहिंपचे केंद्रीय संगठन महामंत्री आणि विनायक राव देशपांडे यांची सह संगठन महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ही बैठक दर सहा महिन्यांनी आयोजित केली जाते. जगभरात राहणारे विश्व हिंदू परिषदेचे विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य बैठकीत सहभागी होतात. यावेळी बैठकीत एकूण ३७१ प्रतिनिधी सहभागी झाले होते.