‘पंचायत २’ फेम अभिनेत्री आंचल तिवारी सह २ भोजपूरी आणि अन्य ६ जणांचा भीषण अपघातात मृत्यू

    27-Feb-2024
Total Views |

panchayat 2 
 
मुंबई : भोजपूरी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बिहारमधील कैमूर जिल्ह्यात रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका भीषण अपघातात ३ भोजपूरी कलाकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘पंचायत २’ वेब मालिकेतील अभिनेत्री आंचल तिवारीसह अन्य २ कलाकारांचा देखील या अपघातात अंत झाला आहे.
 
बिहारमध्ये ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांची टक्कर झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गायक छोटू पांडे, भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि सिमरन श्रीवास्तव या भोजपूरी कलाकारांचा समावेश आहे. तर अन्य ६ लोकांना देखील आपला जीव या रस्ते अपघातात गमवावा लागला आहे. तसेच, दुचाकी चालकाचा देखील यात मृत्यू झाला.