मुंबई: वृत्तसेवांनी दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समुहाकडून आता संरक्षणात क्षेत्रातील मोठ्या संधीची वाट पाहत नजीकच्या काळात संरक्षणात मोठी गुंतवणूक करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये ३००० कोटींची अदानी एरोस्पेस व डिफेन्स एम्युनेशन कारखाना सुरू करणार असल्याची माहिती वृत्तपत्राने दिली आहे. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांचे पुत्र व अदानी एंटरप्राईजचे उपाध्यक्ष जीत अदानी यांनी एका कानपूर येथील कार्यक्रमात बोलताना प्रसारमाध्यमांना, आपण हजारो करोड रूपयांच्या गुंतवणूकीसाठी इच्छूक असून भारत व देशाबाहेर गुंतवणूक संधीसाठी इच्छुक आहोत. इतर व्यवसायांप्रमाणे यातील वाढीची शाश्वती नसली तरी हे गुंतवणूकीसाठी चांगले क्षेत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दक्षिण आशियातील सर्वाधिक मोठे मिसाईल व दारूगोळा निर्मिती क्षेत्र असणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
सुरूवातीला या प्रकल्पातील गुंतवणूक ३००० कोटी रुपयांची झाली आहे. २०२८ पर्यंत याहून अधिक ८००० कोटी रूपयांची गुंतवणूक प्रकल्पात केली जाऊ शकते. या प्रकल्पामुळे ४००० लोकांना रोजगाराची संधी निर्माण होईल असा अंदाज बांधला जात आहे.