लवकरच भारतात रिलायन्स व डिस्नेकडून होणार मोठी घोषणा

26 Feb 2024 12:02:30

Reliance Disney
 
 
मुंबई: रिलायन्स व वॉल्ट डिस्ने यांच्या धोरणात्मक भागीदारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. भारतातील रिलायन्स व वॉल्ट डिस्ने यांच्यातील करार पूर्ण झाला आहे. नव्या माहितीनुसार नवीन कंपनीतील ६१ टक्के भागभांडवल मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे राहणार आहे व उर्वरित डिस्ने कंपनीकडे राहू शकते. याविषयी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दोन्ही कंपन्यांकडून आली नसली तरी याविषयी खात्रीलायक सुत्र वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले. भविष्यात टाटा प्ले मध्ये रिलायन्स समभाग खरेदी करू शकते असे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. नवीन कंपनीतील समभागाचे समीकरणे काळानुरूप बदलू शकते. परंतु सध्या नव्या मिडिया कंपनीत रिलायन्सचा वाटा अधिक असणार आहे.
 
भारताकडे भविष्यातील महत्वाचे आर्थिक बाजार म्हणून मनोरंजन कंपन्या पाहत आहेत. अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक, खरेदी किंवा विलीनीकरण करण्यासाठी इच्छुक आहेत. रिलायन्स व डिस्ने कंपन्यांच्या आर्थिक वर्ष महसुलात २५००० कोटी रुपयांपर्यंत मोठी वाढ झाली होती. इकॉनॉमिक टाइम्स दिलेल्या माहितीनुसार, सुत्रांच्या मते या आठवड्यात या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी व्हायोकॉम १८ कंपनीत रिलायन्स व बोधी ट्री कंपनीने १५००० कोटी रूपयांची गुंतवणूक केली.
 
आर्थिक घडामोडीतील बदलानंतर डिस्ने कंपनीसाठी भारत हे मुख्य मार्केट राहिलेले नसून अमेरिकेत डिस्ने आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरली आहे. रणनीतीचा भाग म्हणून डिस्ने भारतातील उलाढाल कमी करू शकते दुसरीकडे रिलायन्सकडून नवीन आस्थापनेत मोठी गुंतवणूक केली जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0