राष्ट्र सेविका समितिची 'अर्धवार्षिक बैठक'

25 Feb 2024 14:28:34
rss
 
काशी : राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळाच्या दोन दिवसीय अर्धवार्षिक बैठकीला नुकतीच अतुलनंद कॉन्व्हेंट स्कूल, वाराणसी येथे सुरुवात झाली. समितिच्या प्रमुख संचालिका शांताक्काजी आणि प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्रीजी बैठकीला पूर्णवेळ उपस्थित आहेत. या बैठकीत ३५ प्रांतातील ११५ प्रतिनिधी उपस्थित आहेत.


rss 2
 
सभेच्या उद्घाटन सत्रात मागील बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील एकूण १२ क्षेत्र आणि ३८ प्रांतांमध्ये समितीच्या ३७०० हून अधिक शाखा कार्यरत आहेत. देशभरातील एकूण १०४२ जिल्ह्यांपैकी ८१० जिल्ह्यांमध्ये समितीचे काम सुरू आहे. समितीच्या महिला कार्यकर्त्यांकडून देशभरात सुमारे १५०० सेवा कार्ये सुरू आहे. दरम्यान समिती शिक्षा वर्ग, वैचारिक चर्चेला चालना आणि देशभरात होणाऱ्या महिला संमेलनांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. याशिवाय महिलांची सद्यस्थिती आणि देशातील सामाजिक परिस्थिती आणि काही उद्योन्मुख विषयांवर चिंतनही होणार आहे.
Powered By Sangraha 9.0