आनंदाची बातमी: केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मार्चमध्ये ' दिवाळी'

24 Feb 2024 13:25:08

Allowances
 
 
 
 
 
 
 
आनंदाची बातमी: केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मार्चमध्ये ' दिवाळी'
 
 
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए भत्यात ४ टक्के व डीआर भत्यात ५० टक्क्याने वाढण्याची शक्यता
 
 
मुंबई: केंद्र सरकारच्या डीए व डीआरमध्ये वर्षातील दोनदा वाढ जाहीर होत असते. डीए (डिअरनेस अलाउंस) व डीआर (डिअरनेस रिलीफ)मध्ये मार्चमध्ये यंदा दिवाळी साजरी होऊ शकते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए भत्यात ४ टक्के व डीआर भत्यात ५० टक्क्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. सीपीआय (कनज्यूमर प्राईज इंडेक्स) निर्देशांकांच्या तुलनेत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या भत्यात वाढ करत असते.
 
 
यावेळी ही सरासरी ३९२.८३ ठरली आहे. डीए हा सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व डीआर हा सरकारच्याच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लागू असतो. जानेवारी व जुलै महिन्यात दरवर्षी सुमारे दोनदा ही वाढ होत असते. परंतु यंदा ही वाढ मार्चपर्यंत होण्याची चिन्हे आहेत.शेवटची भत्यात वाढ ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली.
 
 
जानेवारी २०२४ च्या अनुसार ही वाढ होऊन कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आधीचे प्रलंबित अँरियर (थकबाकी) मिळेल. यामुळे येणारा मार्च ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खरी दिवाळी असणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0