संदेशखाली प्रकरणात ईडीची एन्ट्री! 'शाहजहान'च्या ठिकाणांवर धाडी

23 Feb 2024 18:28:28
 Sandeshkhali
 
कोलकाता : महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपी शेख शाहजहानच्या सहा ठिकाणांवर ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. शाहजहानवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शेख शाहजहान अटकेच्या भितीने सध्या फरार आहे. ईडीच्या पथकाने दि. २३ फेब्रुवारी २०२४ शुक्रवारी अवैधरित्या जमीन बळकवल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा फरार नेता शेख शाहजहान याच्या ठिकाणांवर धाड टाकली.
 
शेख शाहजहान बरोबरच या प्रकरणातील टीएमसी नेते आणि इतर संशयितांच्या घरावर छापे टाकण्याचे काम सुरू आहे. दि. २९ फेब्रुवारी रोजी तपासात सामील होण्यासाठी शहाजहानला नवीन समन्स जारी केल्यानंतर ईडीने हे छापे टाकले. गेल्या महिन्यात, ईडीने सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी दोन स्वतंत्र छापे टाकले होते. यामध्ये संदेशखळी येथील शाहजहानच्या घराचा देखील समावेश होता.
 
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील अनेक महिलांनी तृणमूल काँग्रेसचा नेता शाजहान आणि त्याच्या साथीदारांवर जमीन बळकावल्याचा आणि दबावाखाली लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. संदेशखळी येथे त्यांच्या अटकेसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0