दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पदरात विक्रमी सामंजस्य करार : उदय सामंत

23 Feb 2024 22:35:41
Uday Samant On Devendra Fadnavis

नागपुर
: दावोसमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नसले तरी त्यांचे अदृश्य हात त्याठिकाणी काम करत होते, असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की, महायुतीत फडणवीस हेच सुपर सीएम आहेत. कारण पडद्यामागून सर्व काही तेच ठरवत असतात. नागपुरात "पेनॉर्ड रिकार्ड" या वाईन कंपनीसोबत महाराष्ट्राच्या उद्योग विभागाने सामंजस्य करार केले. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी हे विधान केले आहे.

तसेच आतापर्यतचे सर्वाधिक ३ लाख ७२ हजार कोटी रुपयांचे एमओयू दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पदरात पडल्याचं ही सामंत म्हणाले. त्याचबरोबर फडणवीसांनी विदर्भासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात उद्योग आणल्याचे ही त्यांनी सांगितले. कोकणात तुमचा एक सहकारी म्हणून काम करतो, त्यामुळे माझ्या मतदारसंघातही एखादा उद्योग द्यावा अशी विनंतीही सामंत यांनी पेनॉर्ड रिकार्ड या वाईन कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारावेळी केली.
Powered By Sangraha 9.0