इन्फोसिसला मागे टाकत स्टेट बँक ऑफ इंडिया पाचव्या क्रमांकावर

23 Feb 2024 17:46:19

SBI
 
 
मुंबई: पब्लिक सेक्टर युनिट म्हणून देशातील नामांकित बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय) ने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर कंपनी इन्फोसिसला मागे टाकत पहिल्या पाचात आपले बीज रोवले आहे. बाजारात मूल्यांकनात (मार्केट व्हॅल्यएशन) मध्ये भरारी घेत देशातील पाचव्या क्रमांकावर एसबीआय बँक ठरली आहे.
 
कालच्या शेअर बाजारात कंपनीच्या समभागात १.५१ टक्क्याने वाढ होत कंपनीचा समभाग ७११.५५ पातळीवर बीएसीत पोहोचला गेला. काल इंट्रा डे ट्रेडिंगने ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळी गाठत ७७७.५० पातळीवर एसबीआय समभाग पोहोचले.त्यामुळेच मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये भर पडल्यामुळे काल एसबीआयने अखेरच्या टप्प्यात इन्फोसिसला मागे सारत नवीन यश प्राप्त केले आहे. इन्फोसिसच्या ६८७३४९.९५ कोटींच्या तुलनेत एसबीआयचे मार्केट कॅपिटलायझेशन ६८८५७८.४३ कोटी झाले.
 
सर्वात प्रथम क्रमांक टाटा सर्विसेस कन्सल्टन्सीचा आहे त्यामागोमाग एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक एसबीआय, इन्फोसिस,एल आय सी,भारती एअरटेल, हिन्दुस्तान युनिलिव्हर,आयटीसी आहेत.
 
Powered By Sangraha 9.0