
मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनसीपीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ला पेटीएमने केलेल्या विनंतीवर सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. पेटीएमने ग्राहकांच्या व्यवहार सुलभीकरणासाठी युपीआय पेमेंटसाठी स्वतंत्र व्यवस्था बनवण्यासाठी विनंती केली होती.
या मागणीचा विचार करत एनसीपीआयला यात लक्ष घालून यावर विचार करण्यासाठी सुचवले आहे. कायद्यांचा तरतूदीत बसणारे व पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशनचा ग्राहकांना विना अडथळा युपीआय व्यवहार करण्यासाठी एनसीपीआयकडून व्यासपीठ बनवता येईल का या संदर्भात सूचनाही केल्या होत्या असे रिझर्व्ह बँकेने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
पेटीएम युपीआयची अस्तिवात असलेल्या ग्राहकांची सोय होण्यापूर्वी कुठल्याही नव्या ग्राहकांना 'ऑन बोर्ड ' घेण्यास सेंट्रल बँकेने मनाई केली आहे. आरबीआयच्या माहितीनुसार '@paytm' ग्राहकांना सुरळीतपणे पेमेंट पार पाडण्यासाठी हे निर्देश दिले आहेत. पेटीएम पेमेंट बँकेला रिझर्व्ह बँकेने १५ मार्चनंतर सेवा खंडित करण्याचे निर्देश दिल्याने यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरू आहे. २९ फेब्रुवारीनंतर कुठलेही नवीन व्यवहार पेमेंट बँकेत करता येणार नाहीत.