अंबानी परिवार आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये , ' हे ' करणार लाँच

23 Feb 2024 16:44:05

Jio Ai
 
मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या महत्वाचा क्षेत्रातील उलाढाल महत्वाची ठरत असताना भारतातील उद्योजक देखील याबाबत मागे नाहीत. कारणही तसे महत्वाचे आहे कारण मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मोठी म्हणून ओळख असणाऱ्या रिलायन्स कंपनीने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्पादन निर्मितीकडे मोर्चा वळवला आहे. ' भारत जीपीटी ' नामक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) मॉडेल तयार केले जाणार आहे. रिलायन्सचा वरदहस्त असल्याने यात मोठी गुंतवणूक अंबानी कुटंब करण्याची चिन्हे वर्तवली जात आहे.
 
 
यामध्ये विविध ११ भाषांतील इंटेलिजन्स लार्ज लँगवेज मॉडेल तयार केले जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. एका तंत्रज्ञान कार्यक्रमात या भारतजीपीटीची घोषणा करण्यात आली. यामध्ये विशेषतः हेल्थकेअर, गव्हर्नन्स, फायनांशियल सर्विसेस, एज्युकेशन अशा क्षेत्रात त्यातील संशोधनात काम केले जाईल. गेले काही दिवस खाजगी व्हेचर भांडवल मोठया प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक करत आहेत.
 
 
याआधी लाईट स्पीड वेंचर पार्टनर, विनोद घोसला फंड यासारख्या गुंतवणूकदाराचा भरघोस पाठिंबा ओपन ए आय, जनरेटिव एक आय अशा ए आय च्या विविध प्रकारांना मिळत आहे. रिलायन्सचा जिओ टेलिकॉम ब्रँड याआधीच जीओ ब्रेन या ए आय प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. यामुळे नजीकच्या काळात ए आय प्लॅटफॉर्मसाठी गुंतवणूकीत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
 
Powered By Sangraha 9.0