पेटीएम नंतर आता बायजू'ज चर्चेत: सीईओ रविंद्रन यांच्या अडचणीत वाढ

23 Feb 2024 13:53:33

BYJU Raveendran
 
 
मुंबई: एनसीलटी (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) मध्ये बायजू'ज मधील चार गुंतवणूकदारांनी धाव घेतली असून सीईओ रवींद्रन हे कंपनी चालवण्यासाठी पात्र नसल्याची तक्रार केली आहे. कंपनीचे नियोजूनशून्य व्यवस्थापन म्हणत गुंतवणूकदारांनी रविंद्रन यांना संचालक मंडळतून बडतर्फ करण्याची मागणी एनसीलटीकडे केली आहे. परकीय चलन नियंत्रण कायदा (फॉरेन एक्सचेंज मॅनेजर मेअनिंग अँक्ट)अंतर्गत बायजू'ज ची मुख्य कंपनी थिंक अँड लर्न या एडूटेक कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. ईडीने ही कारवाई करत फॉरेन एक्सचेंज मॅनेजर मेअनिंग अँक्ट अंतर्गत ९३६२.३५ कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी चौकशी सुरू केली. 
 
गुंतवणूकदारांनी तक्रार फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार गुंतवणूकदारानी कंपनीच्या अकाऊंटचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. याशिवाय आजच कंपनीने तातडीची सर्वसाधारण सभा ठेवून रविंद्रन यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र रविंद्रन व त्यांच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव बेकायदशीर असल्याचे म्हटले आहे. फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार, नुकत्याच करण्यात आलेल्या राईट ऑफरमधील २०० कोटींच्या चौकशीची मागणी केली आहे.यात गुंतवणूकदारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवले गेले पाहिजेत ही प्रमुख मागणी करण्यात आली होती.
 
परदेशी गुंतवणूक मिळवणे व त्यासंबंधी विनिमय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असल्याने रविंद्रन व कंपनीचे चीफ फायनान्सशियल अधिकारी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. एकेकाळी बायजू'ज चा शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी म्हणून ओळख होती. कंपनीचे एकेकाळी मूल्यांकन २० अब्ज डॉलर होते. परंतु कंपनीला गेल्या वर्षात ९० टक्क्याने फटका बसत तोटा सहन करावा लागला.
 
याविषयी रवींद्रन व कुटुंबियांकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
 
Powered By Sangraha 9.0